
वर्धा : रस्ते नियमांचे पालन न केल्याने तसेच वाहनचाकांच्या चूकांमुळे रोज अपघात होतात. यात अनेकजण गंभीर जखमी होतात. मात्र, या जखमींना वेळेत मदत मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागतो. हो बाब लक्षात घेत आपतक्लीन सेवांचा कसा वापर करून जखमींचा जीव कसा वाचविता येईल याचे प्रात्याक्षिक येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने केसरीमल शाळेच्या परिसरात दाखविण्यात आले.
अपघात घडल्यानंतर जखमींना वेळीच मदत मिळाली तर जीव वाचू शकतो. त्यामुळे सजग नागरिकांनी आपत्कालीन सेवाचा वापर कसा करावा आणि जखमींना कशी मदत करावी याची माहिती प्रात्याक्षिकातून दिली. या आपत्कालीन सेवांमध्ये रूणावाहिका सेवा व अमिशामक दल मार्फत याचे लाईव्ह प्रात्यक्षिक जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालक, स्कूल बस चालक तसेच खाजगी बस चालक असे तब्बल ९० वाहनचालकांना दाखविण्यात आले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन समीर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक मेघल अनासने, साधना कवळे यांनी आयोजन करून मोटार वाहन निरीक्षक विशाल मोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अनुराग सालंकर, निखिल कदम, अमर पखान, विशाल भगत यांनी उल्लेखनीय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.
स्स्ता सुरक्षा सप्ताह साजरा
रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी स्स्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यंदा ११ ते १७ जानेवारी या कालावधीत येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ आयोजित करत आहे.




















































