

वर्धा : क्षुल्लक कारणातून एकाला शिविगाळ करून लाथाबुक्यासह काठीने बेदम मारहाण केली. ही घटना 26 जून रोजी आंजी मोठी येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश मिरगुजी पचारे (55) हे आंजी मोठी येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. नरेश पचारे हे 26 जूनला रात्री 11 वाजताच्या दरम्यान, जेवण करून गल्लीतील राजू घोडमारे, निखील घोडमारे व हबीब पठाण यांच्यासह फिरत होते.
दरम्यान, आरोपी नारायण वाकडे हा त्याच्या दुकानात आला व फिर्यादी जवळून जात असताना तु कठे फिरू लागला. असे म्हटले असता फिर्यादीने तू, का बर म्हणत आहे, काय झाले असे म्हटल्याने आरोपी घराकडे गेला. त्यानंतर आरोपी सर्वांनी मिळून संगनमत करून फिर्यादीच्या घराकडे कूच केली. त्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी नरेश पचारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण बाकडे, प्रवीण बाकडे, अनिल बाकडे, नंदा बाकडे, रोहित बाकडे सर्व रा. आंजी मोठी या पाच जणांविरुद्ध खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.