

पवनार : वर्ध्यावरुन नागपुरकडे भरधाव वेगात जाणार्या कारला मागाहुन येणार्या वाहनाने कट मारल्याने कार पलट्या घेत रोडलगत असलेल्या नालीत जाऊन आदळली यात कारचा चेंदामेदा झाला. ही घटना शुक्रवार (ता. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास पवनार येथील पेट्रोलपंप जवळ घडली.
एमएच ४० बीई ९२८७ ही कार वर्ध्याकडून नागपुरच्या दिशेने जात होती दरम्यान या कारला मागाहुन येणार्या वाहनाने कट मारला यात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रोडवरुन पलट्या खात तीस फुट लांब जात नालीत कोसळली यावेळी एक दुचाकीस्वार यात जखमी झाल्याची माहिती आहे.