

पुलगाव : घराच्या खोलीत अभ्यास करीत असलेल्या चिमुकलीजवळ अचानक ६ फूट लांबीचा साप आल्याने एकच धावपळ उडाली. ही घटना शहरातील चुडीमोहल्ला परिसरात घडली असून चिमुकली सुखरूप बचावली.
मनोज श्रीवास रा. चुडीमोहल्ला यांची मुलगी खोलीत अभ्यास करीत असताना अचानक तिच्याजवळ महाकाय साप आला. तिने लागलीच याची माहिती वडिलांना दिली. त्यांनी सर्पमित्र मनीष घोडेस्वार यांच्याशी संपर्क साधला, मनीष घोडेस्वार यांच्यासह नकुल ठेमस्कर, मंथन नंदेश्वर, सिद्धांत घोडेस्वार लकी जांभुळकर हे श्रीवास यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी घरात असलेल्या धामण प्रजातीच्या सापाला पकडून पुलगाव वनपरिक्षेत्रात सोडले. यावेळी हर्षित मून, आकाश जांभुळकर, प्रफुल्ल राळेकर, अक्षय रोहणकार, निखिल भेले. निखिल डोंगरे, निखिल उमरे आदींनी सहकार्य केले.