
वर्धा : दुचाकी अपघातात जखमी झालेल्या धीरज रतनलाल सोनी (वय 35) रा. धोपटे ले-आऊट पिपरी मेघे वर्धा याचा उपचारादरम्यान नागपूर रुग्णालयात मुत्यू झाला. दुचाकी क्र. एम.एच. 32 ई 2241 चा चालक प्रेमकुमार महेंद्र मरजीवे याच्या दुचाकीवर मागे बसून धीरज सोनी हा प्रतपनगर कारला येथे जात होता.
दरम्यान, प्राथमिक शाळा कारला येथे रोडच्या कडेला असलेल्या लोखंडी बोर्डाला दुचाकीने धडक दिल्याने धीरज याच्या डोक्याला गंभीर मारल लागला होता. त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा म्रुत्यू झाला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रंजना पेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी क्र. एम.एच. 32 ई 2241 चा चालक प्रेमकुमार महेंद्र मरजीवे रा. कारला याच्याविरुद्ध सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















































