

वर्धा : दोन महिन्यांचे वेतन देण्यासह पीएफची रक्कम वेळीच वळती करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र बाह्मस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मे. मदन मोहन टावरी ही एजन्सी जोवर कामगारांचे वेतत व पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वळती करीत नाही, तोपर्यंत काम असेच बंद ठेवून आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलना दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.