

पवनार : येथील उत्कर्ष ग्राम विकास संस्था पवनारच्या वतीने आज ११ नोव्हेंबर रोजी माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या वाढदिवसानिमीत्त गावातील गरजू लोकांना, वयोवृद्ध यांना नविन कपडे वाटप करण्यात आले.
उत्कर्ष ग्राम विकास संस्था पवनारच्या वतीने गावातील गरजू लोकांना, वयोवृद्धांना बऱ्याच दिवसांपासून जेवनाच्या डब्बे पुरविण्यात येत आहे, तसेच संस्थेच्या माध्यमातून अनाथ विधार्थांचे शिक्षण ही योजना बऱ्याच दिवसांपासुन सुरु आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय गांडोळे, हरीभाऊ वझुरकर, सदस्य राजु डगवार, माजी सरपंच अजय गांडोळे, जयंत गोमासे, डॉ. दीलीप वैद्य, राजु वाट, सुरेश मुडे, अशोक काळे, अंबादास वाघमारे, बारसिराम मानोले, गजानन साठोने यांची उपस्थिती होती.