

वर्धा : जिल्ह्यात सततचे ढगाळ वातावरण व पाऊस पडल्याने महाकाळ-सुरगाव वरुन वाहनार्या वाघाडी नदीला पुर आल्याने परिसरातील शेतात पाणी साचले. त्याचा परिणाम पिकावर झाला. त्यामुळे वीसहून अधिक हेक्टर क्षेत्रातील पिक बाधित झाले आहे. यात शेतकर्यांच्या हाती आलेले पिक गेल्याने मोठे नुकसान झालेले असल्याने त्याना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाकाळ येथील सरपंच सुरज गोहो यांनी केली आहे.
महाकाळ-सुरगाव परिसरातील शेतकर्यांनी या वर्षी तुर, कपाशी, सोयाबीनची पेरणी केली सुरवातीला पोषक वातावरणामुळे पिक चांगल्या प्रकारे शेतात डोलत असताना गेल्या काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे परिसरातुन वाहनार्याय वाघाडी नदीलाल पुर आल्यानेन या नदीचे पाणी परिसरातील शेतशीवारात शिरले आणि उभे पिक खरवडून नेले. काही शेतात पाणी साचुन राहिल्याने पिके सडली आणि शेतकर्याच्या हाती आलेले पिक गेले. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असुन या परिसराची पाहणी करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.