
वर्धा : अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. सोबतच यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभाग नोंदवावा तसेच इतरांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.
अस्निहोत्री कॉलेज परिसरातील शिवशंकर सभागृह येथे अमली पदार्थ जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अज्निहोत्री, नाट्य दिग्दर्शक हरीष इथापे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, पुलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांची उपस्थिती होती. यावेळी मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील अलोने यांनी अंमल पदार्थापासून शरीरावर होणारे
उपस्थितांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
गेल्या २६ वर्ष व्यसनाच्या अधीन राहून आता व्यसनमुक्त झालेले अशोक कारेपमोरे यांनी आपले अनुभव कथन करून व्यसनापासून कशा प्रकारे आयुष्याचे नुकसान होते. याबाबत तसेच इंदिरा गांधी व्यसनमुक््त्ती केंद्राच्या संचालक सारिका देशपांडे यांनी सुध्दा व्यसनपुक््तीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवर व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी वंदना कारखेले यांनी पीपीटीद्वारे अपली पदार्थ कायदा, कायद्यातील शिक्षेची तरतूद, व्यसनाथीन लोकांचे पुनर्वसन याबाबत माहिती दिली. तत्पूर्वी नशामुक््त चित्रफितीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चित्रफीत तयार करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी मानले. दुष्परिणाम व मानसिक आरोग्य परिणामाची माहिती दिली. व्यसन हे समस्येचे निराकरण नसून क्षणिक आनंदासाठी कायस्वरूपी आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे साधन आहे. त्यामुळे व्यक्तींनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्याचीही उपस्थिती होती.



























































