Home ◼️ संपादकीय गहू निघालेल्या शेताला आग ; कुटाराची राख ! गावकऱ्यांची धावपळ : अग्निशमन...

गहू निघालेल्या शेताला आग ; कुटाराची राख ! गावकऱ्यांची धावपळ : अग्निशमन दल व देवळी पोलिस घटनास्थळी दाखल

चिकणी (जामनी) : गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता गावलगतच्या शेतात अचानक आगीचे लोळ उठताना दिसल्याने गावात एकच खळबळ उडाली. अर्ध्यांअधिक गातकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाचे वाहन दाखल होण्यापूर्वी गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. चिकणी येथील हेमंत देशमुख यांचे गावालगत शेत आहे. ते शेत यंदा गजानन डफरे यांनी मक्‍त्याने केले होते. गव्हाची मळणी आटोपली होती. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वीज तारांचा स्पर्श झाल्याने शेतात आगीच्या ठिणग्या पडल्या. यामुळे चण्याच्या कुटाराला आग लागली. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण करून आग शेतभर पसरली. मोठमोठे आगीचे लोळ उठू लागले. एवढ्यात सिकंदर शेख घरातून बाहेर आले त त्यांनी जोरजोराने आरडाओरडा केली.

वीज वितरण कंपनीकडून लक्ष देण्याची गरज

चिकणीसह देवळी तालुक्‍यातील गावखेड्यात वीज वितरण कंपनीच्या अनेक वीज वाहिन्या लोंबकळत आहे. यामुळे थोडे वादळ सुटले की वीज तारांचा आपसात स्पर्श होऊन आजीच्या ठिणग्या पडतात. यामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. आता उन्हाळा सुरु झाला असून वादळाने विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागण्याची शक्‍यता अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!