
वर्धा : पोल भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दुभाजकावर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला. कुणाल बावणे (रा. मांडगाव) असे मृतकाचे नाव आहे. समुद्रपुर तालुक्यातील शेडगाव पाटी जवळ हा अपघात घडला.




















































