गार्ड महिलेवर अँसिड हल्ला! शहरातील महावीर उद्यानातील घटना

वर्धा : येथील महावीर उद्यानात सेक्युरीटी गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या महिलेवर तेथेच कार्यरत असलेल्या सेक्युरिटी गार्डने अँसिड हल्ला केला. ही घटना गुरुवार 13 ऑक्टोबर रोजी रात्री 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान घडली.

महिलेच्या अंगावर फेकलेले अँसिड शौचाल्यात वापरायचे असल्याने त्याची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, सदर जखमीला उपस्थित कर्मचारी व नागरिकांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. महिलेचे वय 35 वर्ष असून अँसिड फेकणाऱ्या आरोपीचे वय 45 वर्ष असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहा.पोलिस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. हल्ला करणाऱ्या आरोपीला रामगनर पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here