हिंदी विश्वविद्यालयाचे साटोडा गावात स्वच्छता अभियान

वर्धा : स्वच्छता अभियान अंतर्गत 2 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत साटोड़ा येथे स्वच्छता अभियान (1 ते 15) चालविण्यात येणार आहे. विश्वविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व वर्धा समाज कार्य संस्थानचे विद्यार्थी यांनी साटोड़ा गावात स्वच्छतासंबंधी जनजागृती केली तसेच रॅली काढून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या परिसरात पथ नाट्यातूनही स्वच्छतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिव सिंह बघेल यांनी केले. स्वच्छता पखवाड़ा अंतर्गत प्रयागराज व रिध्दपूर केंद्रांवरही स्वच्छता अभियान व स्वच्छता जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here