3 सट्टापट्टीवर पोलिसांचा छापा! 8 जणांवर गुन्हे दाखल; मुद्देमाल जप्त

वर्धा : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या सुरू असलेल्या स्ट्टापट्टी व जुगार अड्यावर पोलिसांनी 3 ठिकाणी छापा टाकून 8 आरोपींवर गुन्हे दाखल केले. आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व नगदी मुदेमाल जप्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, आष्टी पोलिसांनी आवी येथील लक्ष्मीबाई वार्ड येथे दीपक नारायण भिडे (30) या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व नगदी, असा एकूण 95 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुस-या कारवाईत साहूर येथील रमेश खरबडे या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व नगदी असा एकूण 3 हजार 565 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर खरांगणा पोलिसांनी रामदास कुरलुके, संदीप सिंगाडे, विकास खोब्रागडे, पवन पेटकर, निजय खोब्रागडे, अरुण मुंगळे सर्व रा. पुलई या आरोपींकडून जुगाराचे साहित्य व नगदी असा एकूण 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here