‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा! समता सैनिक दलाने केली मागणी

वर्धा : अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस जामीन न देता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

वैद्यकीय क्षेत्र हे पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परंतु. या क्षेत्राला काळिमा फासणारी घटना १५ नोव्हेंबर रोजी शहरात घडली. ही बाब गांधी जिल्ह्यासाठी लाजिरवाणी आहे. डॉ. सोहन लोहिया यांच्या श्रीनारायण डोळ्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये डोळे तपासण्यासाठी अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत गेली. या पीडित मुलीशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा द्यावी तसेच त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना जिल्हा संघटक अभय कुंभारे, सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, प्रदीप भमत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here