कोंबडबाजारावर छापा! चौघांना अटक; २ लाख २ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वणी : राजरोसपणे सुरू असलेल्या एका कोंबडबाजारावर पोलिसांनी धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले. ही कारवाई २८ ऑक्टोबरला खडबडा मोहल्ला परिसरात वणी पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने पार पाडली.

संतोष श्यामराव ताजणे (38) रा. चारगाव, प्रवीण पांडुरंग वाभीटकर (४५) रा. ताटेवार ले-आऊट लालगुडा, सुनील गंगाराम पिदूरकर (४७) रा. चारगाब, शेख मुजीब शेखहमीद (48) रा. चारगाव यांना रंगेहाथ अटक केली. तर सुरेश काकडे रा. लालगुडा हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. खडबडा मोहल्ला रामघाट निकट निर्गूळा नदीजवळ सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार भरवला जात असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने कुणालाही सुगावा न लागू देता अगदी चपळता पूर्वक त्याठिकाणी धाड टाकली.

कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटना स्थळावरून २ लाख २ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख माया चाटसे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अधिक टेकाळे, हरिन्द्र कुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here