पाणी पिण्यास आला अन्‌ विनयभंग केला

वर्धा : घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी घरी असताना विजू तानबा गुरनुले हा घरी आला आणि मुलीला वडील कुठे आहेत असे म्हणून पाणी पिण्यास मागितले. मुलीने पाणी आणले असता विजूने मुलीशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. तसेच त्यांना पळवून नेल्याच्या घटनाही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत अशा आरोपींवर कारवाई करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here