Home Breaking News पवनार येथील व्यक्तीची रोडलगतच्या शेतात आत्महत्या ; कारण अस्पष्ट ! परिसरात खळबळ

पवनार येथील व्यक्तीची रोडलगतच्या शेतात आत्महत्या ; कारण अस्पष्ट ! परिसरात खळबळ

पवनार : येथील एका व्यक्तीने सातोडा परिसरातील रोडलगतच्या शेतात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. सतीश किरडे (वय ५०, रा. पवनार) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना शेतात एक व्यक्ती गळफास घेत मृत अवस्थेत आढळून आली. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे पवनार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!