कारमधून एमडीसोबत गांजाची वाहतूक ! अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या ; स्थानिक गुन्हे शाखेने पिपरी मार्गावरील जुनापाणी चौरस्त्यावर केली कारवाई

वर्धा : पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक गस्तीवर असताना जुनापाणी चौकात नाकाबंदी करून दोघांना कारसह अटक केली. त्यांच्याकडून एमडी व गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री केली. राजेंद्रसिंग ऊर्फ गुहु लखनर्सिंग जुनी (3१, रा. गिरिपेठ, पिपरी मेघे) व कुणाल नारायणस्वामी अल्पवार (४०, रा. स्वागत कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. हे दोघेही कारमधून मेफेड्रॉन (एम.डी) व गांजा या अमली पदार्थांची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई केली.

जुनापाणी चौकात पोलिसांनी नाकाबंदी करून एम.एच. २९/ ए.बी. ७११७ क्रमांकाच्या कारसह दोघांना ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता २१ हजार रुपये किमतीची ६ ग्रॅम एमडी व ७ हजार ८८० रुपयांचा ३०० ग्रॅम गांजा आढळला. या दोघांनी लहू मिराड, रा. स्वामिनारायण मंदिराजवळ, वाठोडा, नागपूर याच्याकडून अमली पदार्थ मिळाल्याचे कबूल केले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून कारसह ७ लाख ७१ हजारांचा पुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, दिनेश बोथकर,मिथुन जिचकार, दीपक साठे, अभिषेक नाईक व फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोणे, मंगेश थामंदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here