

वर्धा : प्लॉट विक्रीच्या नावाखाली ग्राहकांना खोटे प्रमाणपत्र देत तब्बल 8 लाख 70 हजारांची फसवणूक केली. ही घटना सेलू तालक्यातील सावई पेठ येथे घडली. याप्रकरणी रितेश उमेश जैन (वय 43) यांनी दिलेल्या तक्रारी वरून व्यंकटेश असेट्सचे विजय आनंद शेळके, विवेक दादुराम साठे दोन्ही रा. नागपूर, एनजीएसएस रियल इस्टेटे प्रा. ली चे सनिल तुळशीराम साठवणे यांच्या विरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार व्यकंटेश असेट्स मॅक्झीमायज प्रा. ली च्या वतीने सावई पेठ येथील शेत सर्वे क्र 114/ ब 3.83 हेक्टर शेतात प्लॉट पाडून नोंदणी व प्लॉट विक्रीच्या नावाखाली रितेश जैन व अन्य लोकांकडून लाखो रुपये घेतले. प्लॉटची विक्री न करता बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली. प्रमाणत्र बोगस असल्याचे लक्षात येताच सेलू पोलिसात जैन यांनी तक्रार नोंदविली. पुढील तपास सेलु पोलिस करीत आहे.