
सेलू : भरधाव जाणाऱ्या मोपेड क्रमांक एम. एच. 32 ए आर. 4190 या दुचाकीने समोरून येत असलेल्या ऑटो क्रमांक एम.एच. 31 सी.व्ही 6709 ला जोराची धडक दिली. अपघातानंतर मोपेड रस्त्यावर पडून एकजण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना बुधवारी 15 जून रोजी सांयकाळी 5 वाजताच्या सुमारास सेलू बाजार समितीसमोर सुकळी रोडवर घडली.
आनंदराव भाऊपुरी ब्रह्मणे (वय 52) रा. गडवी ता. बाभूळगाव जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव असून, विकास नरेश तावडे (वय 23) व संगीता नरेश तावडे (वय 35) दोघेही रा. जुवाडी अशी जखमींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की मृतक जुवाडी येथे आपल्या मुलीकडे पाहुणा म्हणून आला होता. सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी म्हणून नातवाच्या मोपेड दुचाकीने ट्रिपलसिट जुवाडी येथून सेवाग्राम येथे जाण्यासाठी निघाले होते सेलूजवळ येताच सुकळी रोडवर दुचाकी मोपेड ही ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ऑटोला धडकली.




















































