

हिंगणघाट : गत काही महिन्यांपासून पेट्रोल, डीजल व गॅस, खाद्य तेल गहू, तादूळ, भाजीपाला अशा अनेक वस्तुचे दर गगणाला भिडले आहे. या महागाईमुळे जनता होरपडून गेलेली आहे. यावर केंद्र सरकार व राज्य सरकार चुपी साधून आहे. त्यावर त्वरीत तोडगा काढला नाही तर वर्धा जिल्हा विकास आघाडी रस्तावर ऊतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
शेतकरी, कष्टकरी, गरीब मजूदर वर्ग हा देशोदडीला लागलेला आहे. कारण केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डीजल व गॅसच्या किमती गगणाला भिडल्या आहे. सर्वसामान्य जनता यात होरपडून गेलेली आहे. हा माहागाईच्या भस्मासुरामुळे अनेक कुटुंब प्रमुख आत्महत्याच्या मार्ग अवलंबीत आहे. सर्व सामान्य जनतेला खाद्य तेलापासून गहू, तांदूळ, भाजीपाला, अशा अनेक वस्तुचेदर गगणाला भिडले आहे. यावर केंद्र सरकार व राज्य सरकार चुपी साधुन आहे. त्यावर बोलायला व निर्णय घ्याला वेळ नाही. अशीच माहागाई वाढत राहिली तर जनता पेटून उठेल व त्याचा परिणाम देशाला व राज्याला भोगावा लागेल.
तरी त्यावर त्वरीत तोडगा काढला नाही तर वर्धा जिल्हा विकास आघाडी रस्तावर ऊतरून आदोलन करण्यात येईल, असा ईशारा कामगार नेते डॉ. उमेश बावरे यांच्या नेतृत्वात निवेदन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. निवेदन देतेवेळी मनीष कांबळे, दिलिप कहुर्के, गुरुदेव साबळे, प्रदिप कोल्हे, देवेन्द्र त्रिपल्लीवार, जिवन उरकुडे, अरूण काळे, चारू आटे, धिरज बालपाडे, प्रदिप मानिकपूरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.