Home ◼️ संपादकीय सरपंचाला मारहाण! दगडाने डोके फोडून केले जखमी

सरपंचाला मारहाण! दगडाने डोके फोडून केले जखमी

वर्धा : वाळू नेण्यास हटकले असता, सरपंचाला शिवीगाळ करीत दगडाने डोक्यावर मारहाण करून, डोके फोडून जखमी केल्याची घटना वायफड येथे १ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली. विजय रामदास राऊत (२७) रा.वायफड असे जखमी सरपंचाचे नाव आहे. सरपंच विजय राऊत यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी वाळू आणून ती रस्त्याकडेला ठेवली होती. पहाटे ६ वाजताच्या सुमारास आरोपी अरुण बावणे हा रस्त्याकडेला ठेवलेली वाळू तो चोरून नेत होता.

दरम्यान, सरपंच विजय राऊत यांनी त्यास वाळू नेत असताना हटकले असता, आरोपी अरुण बावणे याने शिवीगाळ करून प्लास्टीक टोपल्याने, तसेच दगडाने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणी आरोपीवर पुलगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून गुन्हा दाखल केल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली आहे. सरपंच विजय राऊत यांनी अनेक विकासात्मक कामे गावात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!