

तळेगांव (शा.पंत) : नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने जात असलेला टक क्रमांक युपी 64 एटी 3311 चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाला. ही घटना तळेगाव येथील सत्याग्रही घाटात गुरुवारी 3 मार्च रोजी घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. तळेगाव येथील सत्याग्रही घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, या मालिकेत अजून भर पडली आहे.
सदर ट्रक अँल्युमिनियंमचे प्लेट घेऊन जात होता. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र, चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच ट्रकचेही मोठे नुकसान झाले. तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तळेगावचे ठाणेदार आशीष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश साहू व सूरज राठोड तपास करीत आहेत.