

वर्धा : जुन्या वादातून युवकाला तलवारीने तसेच फरशीने जबर मारहाण करीत जखमी केल्याची घटना शांतीनगर परिसरात १८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तीन आरोपींना अटक करीत बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केलेल्यात मनीष भुजाडे, दद्दू यादव, सुधीर आगलावे यांचा समावेश आहे.
दुर्गा संतोष राजपूत ही कुटुंबासह घरी असताना आरोपी मनीष भुजाडे, दद्दू यादव, सुधीर आगलावे हे हातात तलवारी, फरशा घेऊन घरासमोर आले आणि शिवीगाळ करणे सुरू केले.दरम्यान, वडील संतोष राजपूत यांनी शिवीगाळ करण्यास हटकले असता मनीष भुजाडे याने दुर्गाच्या हातावर’फरशीने मारहाण केली. दरम्यान, सुरेश राजपूत हा कार घेऊन आला असता त्याच्या कारवर तलवारीने आणि फरशीने मारहाण करीत कारचे नुकसान केले. सुरज कारच्या बाहेरनिघाला असता दद्दू यादव याने सुरजच्या मानेवर तलवारीने जबर मारहाण करीत त्यास जखमी करून सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दुर्गाने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.