

वर्धा : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन महिलेच्या डोक्यात वीट हाणून तिला जखमी करण्यात आल्याची घटना नजीकच्या पवनार येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने ती सासू सासऱ्याकडे मुलांना घेऊन पवनार येथे राहते. नातेवाइकाचे लग्न असल्याने महिला मुलांना घेऊन लग्नाला जात असल्याच्या कारणावरून भासरे हंसराज ऊर्फ बाल्या महापुरे यांनी महिलेशी वाद केला. सोबत भाचा गणेश सूडीत याने महिलेला पकडून ठेवत हंसराज यांनी तिला वीट मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.