
वर्धा : टिनात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागल्याने कुटकी येथील सोहम विष्णू सहारे (6) याचा मृत्यू झाला. ही घटना भाऊबिजेच्या दिवशीच घडली. प्राप्त माहितीनुसार, सोहम हा करंट लागल्याने तो टिनावरच पडून राहिला. गावातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने हिंगणघाट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृतक घोषित केले. वडनेर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. ठाणेदार शेट्ये यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्याचे वडिल मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.


















































