घरातील दागिन्यांसह रोख रक्‍कम लंपास

वर्धा : घरात काम करणाऱ्या मोलकरणीने घरातील दागिने आणि रोख रक्‍कम लंपास केल्याची तक्रार रामनगर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ही घटना मुडे ले-आऊट परिसरात घडली. मंजुळा लक्ष्मण पिसे यांच्या घरी त्यांनी कामकाजासाठी लता नामक महिलेला ठेवले होते. सकाळच्या सुमारास त्या झोपून उठल्या असता त्यांना पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी, ४० हजार रुपये रोखसह पर्स चोरी झाल्याचे समजले. लतानेच एक लाख ६० हजार रुपये मुद्देमाल असलेली पर्स चोरून नेली असावी, अशा संशयाची तक्रार रामनगर पोलिसात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here