

वर्धा : तलवारीच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्यास रामनगर पोलिसांनी अटक केली. गौरक्षण वॉर्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पँथर चौक परिसरात तलवारीचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात व्यक्तिस अटक करीत तलवार जप्त करुन रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी डोकेवर काढले असून दररोज दहशत पसरविणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे. अशांवर कठोर कारवाई करुन त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात यावे, अशी मागणी आता संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.