
समुद्रपूर : दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी निघालेल्या दुचाकीला मागून अज्ञात ट्रक ने धडक दिल्याने दुचाकी वर मागे बसून असलेला युवक जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शेडगाव जाम रोडवर दुपारी 3 वाजताच्या सूमारास घडली. दिनेश सुधाकर वाटकर वय 33 वर्ष रा मांडगाव असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
मंगेश कृष्णाजी देशमुख वय 33 वर्ष रा मांडगाव हा त्याची दुचाकी क्रमांक MH32- M- 2371 वर मृतक दिनेश वाटकर ला घेऊन शेडगावं कडून जाम दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात होते त्याच वेळी मागून अज्ञात ट्रकने मागून धडक दिली त्यामध्ये दुचाकी वर मागे बसून असलेला दिनेश वाटकर रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर दुचाकी चालक मंगेश देशमुख जखमी झाला घटने ची माहिती मिळताच वाहतूक महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहा पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, पोलीस कर्मचारी भारत पिसुड्डे, गौरव खरवडे, प्रदीप डोंगरे यांनी जखमीना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.


















































