सेलू तालुक्यात कोरोणाबाधीतांचा आकडा वाढतीवर! हिंगणी पाठोपाठ सेलू, केळझरमध्येही रुग्ण सापडले

सेलू : तालुक्यातील हिंगणी पाठोपाठ सेलू, केळझरमध्ये गुरुवारी कोरोणाचे रुग्ण आढळून आले असून तालुक्यात रुग्णांची संख्या २४ वर पोहचली तर आतापर्यंत कोरोणाबाधीताची आकडा १२८ वर पोहचला असून दररोज रुग्ण आढळून येत असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेलू शहरात गुरूवारी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर धानोली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या अँपकाँन कंपनी चे 9 जण पाँझेटीव्ह आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ माजली आहे आतापर्यंत तालुक्यात कोरोणामुळे तिन जणांचे प्राण गेले यात दोन हिंगणी तर एक सेलूतील आहे. गरुवारी हिंगणी येथील एक केळझर येथे पाच, दहेगाव (गोसावी) येथे एक, व सिंदी येथेही कोरोणाचे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात कोरोणाबाधीताचा आकडा २४ वर गेला तालुक्यात दररोज रुग्ण आढळून येत असल्याने उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी हिंगणी गावाला भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगावी नियमांचे पालन करावे व आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here