दुचाकीची तोडफोड; व्यक्तीला काठीने मारहाण

हिंगणघाट : शिवीगाळ करण्यास हटकले असता मद्यपीने दुचाकीची तोडफोड करून व्यक्तीला काठीने मारहाण करीत जखमी केले. बुरकोणी येथे ही घटना घडली. निखिळ संजय पाटील मद्यप्राशन करून कविता गणेश पाटील यांच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करीत होता. दरम्यान कविताने त्यास शिवीगाळ करण्यास हटकले असता निखिलने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच मुलाच्या दुचाकीची तोडफोड केली. तेवढ्यात सासरे किसन पाटील हे वाद सोडविण्यासाठी गेळे असता त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here