
वर्धा : नायलॉन मांज्यावर बंदी असतांना अनेक दुकानात नायलॉन मांज्या वक्री होत आहे. वर्धाध शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शहरातील चार दुकानदारांवर कारवाई केली.
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश नागरीक प्रतिबंधीत नायलॉन मांज्याचा वापर करीत पतंग उडवित आहे. परिणामी शहरातील वाहनचालक लहान मुले, पक्षी जखमी होत आहे. याबबद अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या त्यातून ही कारवाई करण्यात आली.
















































