Home ◼️ संपादकीय शेती साहित्य चोरणारी टोळी जाळ्यात ! चार महिलांसह तीन पुरूषांना घेतले ताब्यात

शेती साहित्य चोरणारी टोळी जाळ्यात ! चार महिलांसह तीन पुरूषांना घेतले ताब्यात

वर्धा : शेतातील बंडा फोडून त्यातून शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड झाले असून एकूण एक लाख ५० हजार ९५० रुपये जप्त करण्यात आले आहे. या चोरी प्रकरणी चार महिलांसह तीन पुरूषांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे सुनिता सुनील लष्कर (वय ३२), अंजली गोविंद चव्हान (वय ३१) निशा रामा मुळे (वय २०) तिघेही रा. वडार झोपडपट्टी आवी नाका आणि पुजा शंकर दांडेकर (वय २८), शंकर प्रभुजी दांडेकर (वय २९) दोन्हा रा. सावजी नगर पिपरी (मेघे) आणि ऑटो चालक आकाश बालाजी वाकेकर(वय ३२, रा. बोरगाव मेघे), भंगार दुकानदार शेख नबी शेख महेबुब (वय ५२, रा. सार्डनगर, वॉर्ड कमांक पाच, म्हसाळा) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिस सुत्रानुसार, अक्षय हाडे आणि घनश्याम बोरकर यांच्या शेतात असलेल्या बंड्यातून शेतीसाहित्य चोरी करण्यात आल्याची तक्रार सेलू पोलिसात करण्यात आली, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखळ करून तपास सुरू केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला. यात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या अभिलेखावरील सऱ्हाईत गुन्हेगारांबाबत बारकाईने तपास केला असता आवी नाका येथील वडर झोपडपट्टी येथील महिलांनी ही चोरी केल्याचा संशय बळावला. अधिक तपास केला असता ही चोरी त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

गुन्ह्यातील चोरी केलेले साहित्य हे आकाश बालाजी वाकेकर याचे ऑटोने भंगार दुकानदार शेख नबी शेख महेबुब याला विकल्याचे बकुल केले. यावरून दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेले शेती साहीत्य, जप्त करण्यात आहे. ताब्यात घेतलेल्यांना तपासाकरिता सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अप्रवालळ, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक राहुल इंटेकर, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, रितेश गेटमे, पियुषा घोटे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!