Home ◼️ संपादकीय दगडांवर उतरली वारली, मधुबनी आणि विचारांची कला ; विद्यार्थ्यांसाठी अनोखी चित्रकला स्पर्धा...

दगडांवर उतरली वारली, मधुबनी आणि विचारांची कला ; विद्यार्थ्यांसाठी अनोखी चित्रकला स्पर्धा ! दगडांवर रंगांची उधळण

वर्धा : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात रविवारी (२५ जानेवारी) भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरातील दगड एकत्र करून पाच मोठे ढिगारे तयार करण्यात आले होते. या निर्जीव दगडांवर विद्यार्थ्यांनी रंगांच्या साहाय्याने अप्रतिम चित्रकला साकारून कला प्रतिभेचे दर्शन घडवले.

या स्पर्धेत काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची पारंपरिक वारली कला, तर काहींनी मधुबनी चित्रकलेचे प्रभावी सादरीकरण केले. तसेच गांधीजींचा चरखा, विद्यापीठाचे प्रतीकचिन्ह, एनसीसीचा लोगो, स्वच्छतेचा संदेश, शिक्षण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आदी विषय विद्यार्थ्यांच्या चित्रांतून ठळकपणे मांडण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दगडांवर रेखाटलेल्या कलेतून आपली सर्जनशीलता व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी दिले होते. या स्पर्धेसाठी प्रदर्शनकारी कला विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश पावडे यांनी संयोजक म्हणून, तर शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राम अवध यांनी सह-संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. रंगांच्या स्पर्शाने त्यांनी जणू निर्जीव दगडांमध्ये प्राण फुंकले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीतील डॉ. विधु खरे दास, डॉ. वीरेंद्र प्रताप यादव, डॉ. संदीप सपकाले, डॉ. चंद्रशेखर पांडेय, बी. एस. मिरगे, संगीता मालवीय आदींनी मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेच्या परीक्षक मंडळात प्रसिद्ध चित्रकार आशीष पोहाने, संजय तिरले व आशीष उजवने यांचा समावेश होता. रंगीबेरंगी चित्रांमुळे विद्यापीठ परिसर अधिक आकर्षक झाला असून, त्यातून कला व संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!