Home ◼️ संपादकीय वाद विकोपाला गेला; सासरा व सुनेने प्यायले विषारी औषध

वाद विकोपाला गेला; सासरा व सुनेने प्यायले विषारी औषध

वर्धा : छोट्या मुलीला बिस्किट देण्यावरून सासरा व सुनेमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे रागाच्या भरात सासऱ्याने विषारी औषध घेतले. सासऱ्यांनी औषध घेतलेले बघताच सुनेने सुद्धा औषध प्राशन केले. ही घटना १६ जानेवारी रोजी घडली. मात्र, उपचारादरम्यान सासऱ्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रामभाऊ तानबाजी मोहर्ले (७२, रा. जोजी) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी मुलगा विनोद मोहर्ले यांनी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून सेवाग्राम पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तक्रारकर्ता हा १६ जानेवारी रोजी कामानिमित्त घराबाहेर पडला होता. घरी मृतक व सून हे दोघेच होते. त्यावेळी तक्रारकर्त्याच्या मुलीने पत्नीस बिकीस्ट मागितले. मात्र, सुनेने पैसे नाहीत, असे सांगितले. सोबत मुलीला एक चापट मारली. यामुळे मृतक सासऱ्याने लहान मुलीला का मारते, असे विचारले असता सासरा व सुनेत वाद झाला. या वादातून सासऱ्याने विषारी औषध प्राशन केले. सासऱ्याने औषध प्राशन केलेले बघताच सुनेने सुद्धा विषारी औषध प्राशन केले. दोघांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू होते. अशात शुक्रवारी सासरा रामभाऊ मोहर्ले यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!