Home ◼️ संपादकीय हिंस्त्रपशूंच्या गडद छायेत ३०० एकर शेती ! आदिवासी शेतकऱ्यांचा आर्त टाहो दुर्लक्षित;...

हिंस्त्रपशूंच्या गडद छायेत ३०० एकर शेती ! आदिवासी शेतकऱ्यांचा आर्त टाहो दुर्लक्षित; उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर

वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पबाधित आदिवासी शेतकरी कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या शेतकऱ्यांची आर्वी तालक्यातील मोजा मांडला येथील कसदार जमीन किर्र जंगलात आहे. ही जमीन गावापासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. वाघांसह हिंस्त्र- उपट्रवी बन्यप्राण्यांच्या भीतीमुळे गेल्या २५-३० वर्षांपासून हे शेतकरी जमीन कसत नाहीय. या शेतजमिनी शासनदरबारी जमा करून गावाशेजारी शासन वा वनविभागाच्या शेतजमिनी उपलब्ध करून द्याव्या, अशी एकमुखी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. आमचे आक्रंदण शासन-प्रशासनाळा ऐकू येईल का, असा त्यांचा सवाल आहे.

पिपरी (पुनर्वसन )- सालोड हिरापूर येथील आदिवासी व निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी श्रीधर गणपत उईके यांनी आपल्या कुटुंबाबर ओढवलेल्या गंभीर परिस्थितीबाबत शासन-प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, आता त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून जंगलात अडकलेल्या अन हिंस्त्र पशूंचा वावर असलेल्या वडिलोपार्जित जमीन पडित पडल्यामुळे त्यांचे कुटुंब अक्षरशः उद्‌ ध्वस्त झाले. आर्थिक विवंचनेमुळे वेळीच उपचार करता न आल्याने त्यांच्या पत्नीचा जीव गेला, असा त्यांचा गंभीर आरोप आहे.

मांडला येथे आदिवासी शेतकऱ्यांची सुमारे ३०० एकर जमीन आहे. हे शिवार किर्र जंगलाने वेढले आहे. या शेतजमिनी गावापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.वाघ व इतर हिंस्त्र-उपद्रवी वंन्यप्राण्यांच्या भीतीमुळे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून येथील कुणीही जमीन कसू शकलेला नाही. एकरी १५ ते २० क्विंटल कापूस,देणारी ही काळी कसदार जमीन आता पडीक असल्याची व्यथा उईके यांनी खेद व्यक्‍त करीत विशद केली. गावाजवळ सुरक्षित ठिकाणी शेतजमीन किंवा शासनाने मोबदला दिला असता तर कुटुंबाची आर्थिक स्थिती सावरली असती, असा त्यांचा दाबा आहे. मात्र वर्षानुवर्षे दिलेले अर्ज प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याच आर्थिक ताणामुळे पत्नी पद्मा उईके यांच्या कर्करोगाबरीळ उपचारासाठी लाखो रुपये कर्ज करावे लागळे. पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. पत्नीच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी उईके यांनी वर्धा येथील घर व भूखंड कमी किमतीत विकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!