
वर्धा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला पवित्र असे संविधान देऊन सर्व जाती धर्मांना जगण्याचे हक्क व अधिकार दिले, पण मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन काँग्रेस पार्टी कडून केले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पवनार येथे आयोजित स्वागत सभेत केले. यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, खासदार अमर काळे, माजी आमदार रणजीत कांबळे, शैलेश अग्रवाल, अद्विदय मेघे, शेखर शेंडे, यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















































