भरधाव कारची दुचाकीसह प्रवाशी ऑटोला धडक ; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

पवनार : नागपूर वरून वर्ध्याकडे येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक देत प्रवासी ऑटोवर जावून आदळली या घटनेमध्ये दुचाकीस्वारासह ऑटो मध्ये असलेल्या महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार (ता. २४) सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान वर्धा नागपूर महामार्गावरील कान्हापूर जवळ घडली. अपघात घडताच नागरीकांनी जखमींना तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात पोहचवीले. यातील ३ गंभीर जखमींना नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाठवीण्यात आले असून काही जखमीवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सूरु आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पूढील तपास सेलू पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here