

समुद्रपूर : अवैधरीत्या गांजाची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी बुधवारी १४ रोजी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जाम चौरस्ता येथे केली. त्याच्या ताब्यातून 3 किलो गांजासह दुचाकी फोन असा एक लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन युवक मोपेड दुचाकीवरून गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर सापळा रवून कारवाई केली असता दोन युवक दुचाकीने (क्रमांक एमएच- ४९, एवाय- ४२४६ ग्राहकांना गांजा, अमली पदार्थ विक्री करताना रंगेहात मिळून आले. पंचनामा करून त्याच्या ताब्यातून २.९८७ किलो गांजा, दुचाकी, दोन मोबाइल फोन असा एक लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही युवकांवर गुन्हे नोंद करीत अटक करण्यात आली. मो. सरफराज अख्तर अब्दुल सत्तार अन्सारी, (3६ रा. पिली नदी, टिपू सुलतान चौक, नागपूर,) धनेन्द्र प्रल्हाद खोब्रागडे (२७, रा. यशोधरानगर, लालझेंडा चौक, नागपूर) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार संदीप गाडे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, विक्की मस्के, रवी पुरोहित, वैभव चरडे, आशिष कांबळे यांनी केली.