
चिकणी (जामणी) : भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-तुळजापूर महामार्गावरील देवळीनजीक असलेल्या नायरा पेट्रोलपंपासमोर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळावरून ट्रेलर चालकाने पळ काढल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली. अपघातात जखमी दोन्ही वाबगाव येथील रहिवासी असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
ट्रेलर चालकाने त्याच्या ताब्यातील एम. एच. ४०, बी. एल. ६०७५ क्रमांकाचा ट्रेलर भरधाव चालवून समोरील दुचाकीला जबर धडक दिली. दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात होताच चालकाने ट्रेलर जागेवरच सोडून पलायन केले, देवळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेन व जेसीबीच्या साह्याने ट्रेलर रस्त्याच्या बाजूला केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्यासह कुरसंगे, मिथुन राठोड, सलीम, डहाके यांनी धाव घेत दोन्ही बाजूंची ठप्प असलेली वाहतूक सुरळीत केली.




















































