पवनार येथे लम्पीची एन्ट्री! दोन जनावरे बाधित; परिसरातील पशुपालकांत दहशत

पवनार : लम्पी चर्मरोगाने पवनार येथे एन्ट्री केली असून या गावात दोन लम्पी बाधित गो-वंश सापडल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनार येथील घनश्याम बोरकर यांचे वर्धा-नागपूर महामार्गालगत कान्हापूर जवळ शेत आहे. याच शेतात त्यांनी जनावरांसाठी गोठाही बांधला आहे. दोन जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून जनावरांची तपासणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी पशुपालकाला लम्पीचा प्रसार ‘होऊ नये म्हणून जनावरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पवनार येथे खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांपासून गो-वंशांना लम्पी प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. बऱ्याच जनावरांना लसीचे कवच देण्यात आले आहे. असे असले तरी पवनार येथे *ब’ श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना असला तरी दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टरच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here