

वर्धा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सेलूt येथील 16 पानटपरींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून 3200 रुपयांचा दंड वसूल करून माल व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सामान्य रुग्णालय, अन्न व औषधी प्रशासन विभाग तसेच पोलिस विभागाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आली. कारवाईत तंबाखू नियंत्रण कायदा 2003 च्या विविध कलमांचा वापर करण्यात आला आहे.
30 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व ध्रूग्रपान करण्यास मनाई तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, खाने व धूम्रपान करण्यास 2003 च्या कायद्यानुसार 16 पानटपरीवर कार्यवाही करून 3200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन निमोदिया यांच्या मार्गदर्शनात दंत शल्यचिकित्सक डॉ. मोहिता कोडापे, जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्शद ढोबळे ब अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार व कर्मचारी प्रतिक गुरवे, संजय चांदणशे, अमर तेलरांजे, राजू माहुरे, पवन चांभारे, राजेश यादव, सेलू पोलिस विभागातर्फे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेत्रत्वात वानखेडे यांनी कार्यवाही केली.