


इंझाळा : शेतकऱ्यांनी पेरलेले विक्रांत कंपनीचे सोयाबीन उगवले नसून, कंपनीने आमची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देवळी तालुक्यातील आपटी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शुक्रवार 24 जून रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन दिले. पेरणीयोग्य पाऊस आल्याने सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी 19 जून रोजी केली. त्यानंतर पाऊस पडूनही सोयाबीन अंकुरले नाही, विक्रांत कंपनीने आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, असे निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
लवकरात लवकर कृषी विभागाने पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा, नाही तर शेतकरी आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी प्रशांत धांदे, मारोतराव भगत, गजानन बाबळे, कोल्हे, ठाकरे, भीमराव भगत, निष्णुपंत कावडे, निरंजन धवणे उपस्थित होते. कृषी अधिका-याला दिलेल्या निवेदनावर प्रशांत धांदे, मारोतराव भगत, गजानन बाभळे, म.प. कोल्हे, गजानन ठाकरे, सिचन सातपुते, रामक्रष्ण कैलुके, भीमराव भगत, विष्णूपंत कावडे, दिनेशराव साडू, नीरंजन धबने, पंकज शिंदे, दिपक बाभळे, सतीशराव पोहणे, योगेश कोल्हे, श्यामराव शिंदे, प्रतापराव शिंदे, मनोहराव कोल्हे, गजानन पचारे, अरविंद पचारे, ताढईबाई मिआरकर आदी शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.


















































