

तळेगाव (श्या.पंत.) : नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात असलेली भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले. शिवाय कारचेही मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील चिस्तूर शिवारात झाला. शिवम गुप्ता (१९), रंजना गुप्ता (४०) व स्नेहल गुप्ता (१६) अशी जखमींची नावे आहेत.
एम. एच. १२ क्यू. एफ. ७८७७ क्रमांकाच्या कारने गुप्ता कुटुंबीय काही कामानिमित्त नागपूर येथे आले होते. ते परतीचा प्रवास करीत असताना हा अपघात झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना देत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. माहिती मिळताच तळेगाव पोलीस जमादार राजेश साहू, अमोल मानमोडे, राहुल अमूने यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे.