

वर्धा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने 50 टक्के अनुदान योजने अंतर्गत बिजभांडवल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षा करीता 50 टक्के अनुदान योजने अंतर्गत जिल्हयाला 80 टक्केचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसुचित जातीतील महार, बौध्द, खाटीक, डुमार, मेहत्तर, भंगी या घटकातील लाभार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड रहिवासी दाखला, व्यवसायाचे कोटेशन इत्यादी सांक्षाकित कागदपत्रासह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयास अर्ज करावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.