

अमरावती : जागतिक आई दिनानिमित्त मल्टी टास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत “माय रमाई” या आगामी मराठी गीताचे पोस्टर विमोचन करण्यात आले असून “माय रमाई” या गीताचे पोस्टर अमरावती जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले असून या वेळेस कार्यक्रमाला उपस्थित माय रमाई या मराठी गीताचे निर्माता – श्रीहरी सरदार, दिग्दर्शक – सागर भोगे, सहदिग्दर्शक – आशिष सुंदरकर, कला दिग्दर्शक – सुधीर पेंडसे, लेखिका – ललिता वानखडे, गायिका – सोनाली सोनवणे, संगीतकार – चेतन ठाकूर, छायांकन संकलन – किर्तीनंद इंगोले, मेकअप – प्रशांत तालखंडे, प्रमुख कलाकार – वैष्णवी डवरे, विनय भगत, बाल कलाकार – यश वाकळे, प्रोड्क्शन टीम – विशाल वानखडे, हिमांशू सरदार, भूषण जोंधळे, प्रत्युश वानखडे, अमोल कोयकार, मयुर लोणारे, सचिन राजगृहे, मोहन स्वर्गे, ऋषिकेश राऊत, हर्षल वावरे, अक्षय नगराळे, प्रवीण ठाकरे, दर्शन नारनवरे हे सर्व मान्यवर उपस्थित होते. कोटी कोटी जनांनी आई रमाई यांनी आपल्या दैनदिन जीवनात कुटुंबासाठी व परम पुज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी केलेला संघर्ष या गीतामधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आणि लवकरच “माय रमाई” हे गीत मल्टी टास्क या युट्युब चॅनेल ला प्रसारीत होणार आहे. असे मत या गीताचे दिग्दर्शक सागर भोगे यांनी व्यक्त केले आहे. हा कार्यक्रम यशोमतीताई ठाकूर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.