

तळेगाव : सुरतवरून नागपूरला भरधाव जाणाऱ्या टॅव्हल्सने कार व लग्नातील घोड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घोडा गंभीर जखमी झाला. ही घटना अमरावती-नागपूर महामार्गावरील तळेगावलगत उदयराज मंगल कार्यालयाजवळ घडली. सुरत येथून नागपूरला प्रवासी भरून जात असलेल्या जी.जे.14, झेड 2000 क्रमांकाचे टॅव्हल्सने कारमालक प्रकाश शेटे रा. यवतमाळ यांच्या कार क्रएम. एच. 29 बो.व्ही0383 व नवरदेब काढण्याकरिता आलेला घोडा यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. तर घोडा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती तळेगाव पोलिस ठाण्याला मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच टॅव्हल्स चालक श्रीकांत आघाडे रा. नांदगाव खंडेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल केला.