Home ◼️ संपादकीय अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; समृद्धी महामार्गावर घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; समृद्धी महामार्गावर घटना

वर्धा : नागपूरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव धावणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील चॅनल क्रमांक ६४.८८ परिसरात शनिवारी (ता. ४) रात्री सुमारे ११.५८ वाजताच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांनी सहकाऱ्यांसह दिग्रस परिसरातील घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक चौधरी व त्यांचे पथकही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक पाहणीत अज्ञात वाहनाच्या धडकेतच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

मृत बिबट्याचा मृतदेह वर्धा वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला. येथे सहाय्यक वनसंरक्षक एम. के. आडे, मानद वन्यजीव संरक्षक कौशल मिश्र, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर नियमानुसार बिबट्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

🟡 अडीच वर्षांचा नर बिबट…

वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट हा सुमारे अडीच वर्षांचा नर होता. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या व शिकारीच्या शोधात तो महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत सापडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

⚠️ वन्यजीवांसाठी महामार्ग ठरताहेत धोकादायक…

समृद्धी महामार्गावर वन्यजीवांचे अपघात वाढत असल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!