दुचाकीच्या धडकेत एक ठार! एक गंभीर जखमी

सेलू : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती अनियंत्रित झाली व दुसऱ्या दुचाकीवर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झडशी येळाकेळी रोडनजिक असलेल्या हिवरा जोड रस्त्यावर झाला. सुनील दथरथ बांते (४४ रा.हिवरा) असे मृताचे नाव असून, राजू देवतारे (४२ रा.अंतरगावो असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. मृत सुनील हा झडशीकडून मित्राला घेऊन हिवरा येथे दुचाकीने जात होता. दरम्यान, हिवरा येथून राजू देवतारे हा येत असताना अनियंत्रित झालेली मृताची दुचाकी त्या दुचाकीला धडकली. या अपघातात सुनीलचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here